घरमुंबईबुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

Subscribe

बुधवारी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येऊन, या शटडाऊनमुळे पुढील एक-दोन दिवस ठाणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत विविध ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे उद्या बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दिवसभर ठाणेकरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत हा पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तसेच या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती ठाणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करावा असे आवाहन देखील विभागातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – कल्याणमधील जागृती मंडळाची इकोफ्रेंडली गणेशमूर्ति!

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा

ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत विविध ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणी पुरवठा व स्टेम प्राधिकरणकडून होणारा पाणी बंद पुरवठा राहणार आहे. बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०१९ रोजी विविध ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -