घरमुंबईगुरुवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

गुरुवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

Subscribe

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने बारवी जलशुद्धीकरण केंद्र, जांभूळ येथील जलवाहिनीची तातडीने देखभाल व दुरुस्तीची कामं हाती घेतल्यामुळे ठाणे महापालिकेला होणारा पाणी पुरवठा गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर, २०१९ रोजी रात्री १२ ते शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे कळविण्यात आले आहे.

या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे, लोकमान्य-सावररकर प्रभाग समिती अंतर्गत रूपादेवीपाडा, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं.२ वागळे फायर ब्रिगेड, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत गाव, बाळकूम, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -