घरमुंबईठाण्यात लवकरच 'सुपर स्पेशालिटी' रूग्णालय

ठाण्यात लवकरच ‘सुपर स्पेशालिटी’ रूग्णालय

Subscribe

ठाण्यात लवकरच ५४७ बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र वागळे इस्टेट येथील राज्य कामगार विमा योजनेच्या इमारतीत होणाऱ्या स्थलांतराबाबत केंद्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. परंतु त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या ठिकाणी ५४७ बेडचे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक इमारतीचे अंदाजपत्रक आणि इमारतीचे आराखडे तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. मात्र स्थलांतरालाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने बांधकाम सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

thanekar will get have super speciality hospital 2
रुग्णालयाची जीर्ण अवस्था

ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे शंभर वर्षांपूर्वी विठ्ठल सायन्ना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती. जिह्यातील अनेक गरीब-गरजुंसाठी हे रुग्णालय आशेचे किरण आहे. मात्र जीर्ण झालेल्या इमारतींच्या अवस्थेमुळे अनेकवेळा दुर्घटना घडल्या आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून शासन स्तरावर रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. रुग्णालयाच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे, स्पेशालिटी रुग्णालयाची निर्मिती करणे याबाबींचा समावेश होता.

- Advertisement -

स्पेशालिटी रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा

अखेर ९ मार्च २०१८ रोजी रुग्णालयाच्या आवारातील ए, बी, सी,डी आणि ई या पाच जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. १७ जुलै रोजी शासनाचे आदेश प्राप्त झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी सुमारे ५४७ बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतीचे अंदाजपत्रक आणि आराखडे करण्याचे आदेशही विविध विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील दुर्बलांच्या आरोग्यासाठीचा आधार ठरणारे जिल्हा सामान्य रुग्णालय कात टाकू शकणार आहे. मात्र वागळे इस्टेट येथील राज्य कामगार विमा योजनेच्या इमारतीत होणाऱ्या स्थलांतराबाबत केंद्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. परंतु त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी शासनाची मंजुरी मिळाली असली तरी स्थलांतरणाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात स्थलांतर करण्यासंदर्भातील फाईल अद्यापही शासनाकडे पडून आहे. त्यावर निर्णय झाल्याशिवाय या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार नाही. ही बाब लवकरात लवकर पुर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.– डॉ.कैलास पवार – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे

- Advertisement -

भविष्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीब गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल यात शंका नाही. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निर्मितीकरिता सुमारे १६८ कोटी रुपये खर्च असून दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र त्यामुळे ठाणेकरांना अत्याधुनिक सेवा मिळणार आहेत.  – पालकमंत्री एकनाथ शिंदे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -