घरमुंबईआईच्या प्रियकराची हत्या करणार्‍या मुलाला अटक

आईच्या प्रियकराची हत्या करणार्‍या मुलाला अटक

Subscribe

मुलुंडमधील धक्कादायक प्रकार

आईच्या प्रियकराला आईसोबत नको त्या अवस्थेत बघून संतापलेल्या मुलाने प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिरा मुलुंड पश्चिम येथे उघडकीस आला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी २५ वर्षीय मुलाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड पश्चिम येथील मुलुंड वसाहत येथे निलेश (२५, काल्पनिक नाव) हा आई वडिलांसोबत राहतो. निलेश हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. वडील वॉचमन म्हणून एका बांधकाम साईटवर नोकरी करतात. संसाराला हातभार म्हणून ५० वर्षांची निलेशची आई घरातच खानावळ चालवत होती. खानावळीत जेवणासाठी येणार्‍यांपैकी रिक्षा चालक देवेंद्र सिंह (५५) सोबत निलेशच्या आईचे अनैतिक संबंध होते. गेल्या काही महिन्यापासून असणार्‍या या संबंधाबाबत निलेशला काही दिवसापूर्वी कळले होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले होते.

- Advertisement -

सोमवारी रात्री निलेश कामानिमित्त बाहेर गेला होता, तर वडील रात्रपाळीला कामावर गेल्यावर देवेंद्र सिंह जेवणासाठी घरी आला होता. दरम्यान, निलेश हा काम आटोपून घरी आला असता त्याला बाहेर पुरुषाची चप्पल दिसली. घर आतून बंद असल्यामुळे त्याला संशय आला. संतापाच्या भरात त्याने दाराला जोरात धक्का दिला असता दाराची कडी तुटून दार उघडले गेले. आईला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत बघून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. निलेशने मागचा पुढचा विचार न करता आईसोबत असलेल्या देवेंद्रला लाथाबुक्यांनी मारहाण करून दगडाने डोके ठेचून त्याची हत्या केली.

या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या निलेशला ताब्यात घेऊन देवेंद्र सिंह याला उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून निलेशला अटक केली आहे, अशी माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -