घरमुंबईपालिकेच्या अर्थसंकल्पास सभागृहाची मंजुरी, बेस्टचा अर्थसंकल्प मात्र रखडला

पालिकेच्या अर्थसंकल्पास सभागृहाची मंजुरी, बेस्टचा अर्थसंकल्प मात्र रखडला

Subscribe

बेस्टला कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९०३८.३८ कोटींचा अर्थसंकल्प ऑनलाईन सभेअंतर्गत साधकबाधक चर्चेअंती मंजूर करण्यात आला. मात्र बेस्ट उपक्रमाचा १८८७.८३ कोटीं रुपये तुटीचा अर्थसंकल्प पालिकेने अनुदान न दिल्याने मंजुरीअभावी रखडला आहे. मुंबई महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पावर गेल्या चार दिवसांपासून ऑनलाईन सभेअंतर्गत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी चर्चा केली. यावेळी, नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील काही खात्यांच्या तरतुदीबाबत आक्षेप घेऊन काही सूचना केल्या. तर काही नगरसेवकांनी निधी तरतुदीबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली.

मागील विकास निधीचा वापर कोरोनामुळे करता आलेला नसल्याने हा विकासनिधी लॅप्स होऊ नये आणि त्याचा वापर पूर्णपणे करता यावा, अशी मागणी काही नगरसेवकांनी यावेळी केली. बेस्ट उपक्रमाचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प १८८७.८३ कोटी रुपये तुटीचा असल्याने व तो शिलकीचा न दाखवल्याने स्थायी समितीने नाराजी व्यक्त करून तो पुन्हा बेस्टकडे पाठविण्यासाठी पालिका सभागृहाकडे पाठवला होता. मात्र सदर अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजूर करण्यात न आल्याने तो रखडला आहे. तसेच, बेस्टला कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. पालिका सभागृहाने फेब्रुवारी महिन्यातच बेस्टचा अर्थसंकल्प बेस्टकडे परत पाठवला होता. तसेच, बेस्टचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्याबाबतही पालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -