घरमुंबईउपेक्षित पाणजू बेटाची पर्यटनासाठी निवड

उपेक्षित पाणजू बेटाची पर्यटनासाठी निवड

Subscribe

मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि तरीही सर्व सुविधांपासून उपेक्षित राहिलेल्या वसईतील पाणजू बेटाची पर्यटन क्षेत्र म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना आता अच्छे दिन बघायला मिळणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यानच्या दोन खाड्यांमध्ये पाणजू हे गाव आहे. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात शंभर टक्के आगरी बांधव पूर्वापार वास्तव्याला आहेत. चारही बाजू पाण्याने वेढलेल्या या बेटाला स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते.21 स्वातंत्र्य सैनिक या गावाने दिले आहेत. डुबी मारून रेती उपसा करणे आणि मिठागरे ही या ग्रामस्थांची उत्पन्नाची मूळ साधने होती. मात्र, मिठागरे नामशेष झाली आणि रेतीवर बंदी आणल्यामुळे भाईंदर, वसई येथे नोकरी करणे त्यांच्या नशिबी आले.

- Advertisement -

चारी बाजूने पाण्याने वेढलेले असल्यामुळे येथील ग्रामस्थांना रेल्वे पुलावरून चालत जाऊन भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्टेशन गाठावे लागते किंवा बेटावरून बोटीने जाऊन नायगाव जेटी गाठावी लागते. त्यानंतरच ते भाईंदर किंवा वसई तालुक्याशी जोडले जातात.

आतापर्यंत दळणवळण, शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत सुविधांपासून उपेक्षित राहिलेल्या या बेटाला आता पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. निती आयोगाने पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्प्यात देशातील 1382 बेटांमधून 26 बेटांची निवड केली आहे. त्यात पाणजूचाही नंबर लागला आहे. त्यामुळे पाणजूचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून विकास होणार आहे. त्यात रेस्टरुम, टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर, ओपन थिएटर, तलाव सुशोभीकरण यांचा समावेश आहे. त्याबाबतचा आराखडा लवकरच तयार करण्यात येऊन केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी गोळा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली.

- Advertisement -

पाणजूला पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, नारनवरे, प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर आणि तहसीलदार किरण सुरवसे यांनी या बेटाला बुधवारी दुपारी भेट दिली. येथील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पाणजूची पर्यटन क्षेत्र म्हणून निवड करण्यात आल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. तरीही ग्रामस्थांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. या योजनेत कशाप्रकारे ग्रामस्थांना सामावून घेतले जाईल. कोणता रोजगार मिळेल हे अगोदर शासनाने जाहीर करावे, अशी मागणी पाणजूचे माजी उपसरपंच विलास भोईर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -