घरमुंबईबदलापूरमध्ये मेट्रोचा प्रश्न पेटणार

बदलापूरमध्ये मेट्रोचा प्रश्न पेटणार

Subscribe

बदलापूरमध्ये झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येचा रेल्वे सेवेवरही ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत मेट्रो बदलापूरपर्यंत आल्यास चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून एमएमआरडीए मेट्रो कारशेडसाठी बदलापुरात जागेच्या शोधात आहे. त्यासाठी प्रस्तावित स्टेडियमच्या जागेचा विचार सुरू असल्याचीही चर्चा रंगत आहे. परंतु, तसे झाल्यास त्याला कडाडून विरोध करण्याची भूमिका शिवसेना व राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीतील मतभेद पुन्हा उघड
बदलापूरमध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष कालिदास देशमुख व गटनेते आशिष दामले यांच्यातील मतभेद मेट्रो कारशेडच्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. नगर परिषदेत आयोजित सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत दामले यांनी ‘मेट्रो येणार असेल तर स्टेडियमची जागा देण्यास हरकत नाही’ अशी भूमिका मांडली आहे. परंतु, देशमुख यांनी मात्र ही जागा देण्यास विरोध असल्याची भूमिका मांडली आहे. यापूर्वी अंबरनाथ बदलापूर एकत्रित महानगरपालिकेच्या मुद्द्यावरही देशमुख -दामले यांच्यातील मतभेद उघड झाले होते. दामले यांनी एकत्र महानगरपालिकेचे समर्थन केले होते. तर, देशमुख यांनी सह्यांची मोहीम राबवून बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, अशी मागणी केली होती.

- Advertisement -

विकासासाठी मेट्रो हवीच आहे. पण, मैदानेही शहराचा श्वास आहेत. भविष्यात शहराला क्रीडांगणासाठी एवढी मोठी जागा उपलब्ध होणे शक्य होणार नाही. मेट्रो कारशेडसाठी बदलापूर व वांगणीत अनेक पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकतात, त्यांचा विचार मेट्रो कारशेडसाठी केला पाहिजे.
– शैलेश वडनेरे नगरसेवक, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -