घरलाईफस्टाईलहे उपाय करा, काळी मान चमकवा

हे उपाय करा, काळी मान चमकवा

Subscribe

आपल्या शरीरावर अनेकदा मळाचा थर जमा होतो. वारंवार घासून तो कमी केला जातो. मात्र शरीरातील अशी एक जागा असते, जी सतत स्वच्छ ठेवावी लागते. ती म्हणजे मान. कित्येकांना मानेवर काळपट थर साठण्याचा त्रास सहन करावा लागतो. चेहरा स्वच्छ आणि उजळ असतो. पण मान काळी पडते. काही लोकं रोज आंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते. याकरता काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने तुम्ही काळी मान स्वच्छ करू शकता. घरातील काही वस्तूंचा वापर करून हे उपाय करता येतील.

बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसाने त्वचेचा रंग हलका होतो. कच्चा बटाटा किसून मानेवर लावावा किंवा किसलेल्या बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून मानेवर लावा आणि २० मिनिटाने गार पाण्याने धुवावा.

- Advertisement -

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा मानेवरील काळपट मळाचा थर हटविण्यास प्रभावी ठरेल. आपल्याला १ चमचा पाण्यासोबत २ चमचे बेकिंग सोडा मिसळून आपल्या मानेवर लावायचे आहे. नंतर हे वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा अमलात आणा.

कोरफड
कोरफड त्वचेला उत्तम रिझल्ट देतं. कोरफडीचा रस मानेवर लावून अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने मान धुऊन टाका. हे क्रम रोज करा. आपल्याला उत्तम परिणाम हाती लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -