घरमुंबई'वर्षा' बंगल्याची पाणीपट्टी भरण्यासाठी विरोधकांचे 'भीक मांगो आंदोलन'!

‘वर्षा’ बंगल्याची पाणीपट्टी भरण्यासाठी विरोधकांचे ‘भीक मांगो आंदोलन’!

Subscribe

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 'भीक मांगो आंदोलन' करण्यात आले.

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज, मंगळवारी ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या करोडो रुपयांची पाणीपट्टी थकली असल्याचा मुद्दा पकडत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) समोर भीक मांगो आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहीत हे आंदोलन केले. सीएसएमटीसमोर खाली बसून मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी भरण्यासाठी भीक मागत असल्याचे लोकांना सांगितले. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे पैसे देवू केले. ही रक्कम मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहेकारण या बंगल्याचे साडेसात लाखांचे पाणी बिल थकले आहेविशेष म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांनीच पाणी बिल थकवले नसून इतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांची ८ कोटी रुपयांची पाणी बिले थकली आहेतमाहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होतीत्याद्वारे ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी उडवली खिल्ली 

पाणी बिल थकवल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. आव्हाड म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांच्या घरी देश विदेशातून पाहुणे येत असतात. त्यामुळे हे पाहुणे आल्यावर पाण्याची कपात होऊ नये. तसेच मुख्यमंत्री नेहमी व्यस्त असतात त्यामुळे पाणी कपात होऊन आंघोळीला आणि तोंड धुवायला उशीर होऊ नये म्हणून मी बिल भरायला तयार आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच जर राज्य सरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात येणाऱ्या पाण्याचे बिल भरण्याचे पैसे नसतील तर राज्यातील जनतेचं काय? असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -