घरमुंबईविमानाचे अपहरण करून पाकिस्तानला नेऊ

विमानाचे अपहरण करून पाकिस्तानला नेऊ

Subscribe

मुंबई एअर इंडिया ऑपरेशन सेंटरमध्ये धमकीचा फोन

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे देशभरातील प्रमुख शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबईतही रेल्वेस्टेशन, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर आहे. अशा परिस्थितीत शनिवारी विमान अपहरणाची धमकी देणारा एक फोन मुंबईतील एअर इंडियांच्या ऑपरेशन सेंटरमध्ये आल्याने सुरक्षा व्यवस्था आणखीच कडक करण्यात आली आहे. या फोनमुळे देशभरातील सर्वच विमानतळांना खबरदारीचा उपाय म्हणून अती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एका विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तान नेण्यात येईल, अशी धमकी ऑपरेशन सेंटरमध्ये फोन करणार्‍याने दिली. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. कार पार्किंगमधील वाहनांची कडक तपासणी होत आहे. या धमकीच्या फोनबाबत सुरक्षा यंत्रणांकडून माहिती घेतली जात असून या इशार्‍याला गांभीर्याने घेण्यात आले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यातच शनिवारी आलेल्या या फोनमुळे ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीकडून देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमान सेवांशी संबंधित सर्वच विभाग, वाहने, प्रवासी, सामान, नियंत्रण, वाहतूक अशा सर्वच घटकांची कडेकोट तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्काळात तातडीने कारवाई करण्यासाठी संबंधित तैनात पथकांनाही तयार राहण्याचे आदेश आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -