घरमुंबईकल्याण, अंबरनाथमधील गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त !

कल्याण, अंबरनाथमधील गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त !

Subscribe

दीड हजार लीटर गावठी दारू आणि ४ हजार लीटर रसायन केले नष्ट, थर्टी फस्टच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र

एकीकडे सर्वत्रच थर्टी फस्ट साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करत कल्याण आणि अंबरनाथमधील गावठी दारूच्या मोठ्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तब्बल दीड हजार लिटर गावठी दारू आणि ४ हजार लिटर दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन उत्पादन शुल्क खात्याने नष्ट केले. या धाडसत्रात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक सुजित कपाटे यांनी दिली.

कल्याणच्या टाटा पॉवर परिसरातील आणि अंबरनाथच्या मुनारे गावातील गावठी दारूच्या भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात दारू बनवली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसारच ठाणे राज्य उत्पादन विभागाने रविवारी रात्री दोन्ही ठिकाणी धाड टाकून संपूर्ण भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. रात्रभर ही कारवाई सुरू होती. या धाडसत्रामध्ये तब्बल दीड हजार लिटर गावठी दारू आणि ४ हजार लिटर दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन उत्पादन शुल्क खात्याने नष्ट केले. केवळ ३१ डिसेंबरच नव्हे तर यापुढेही अशाप्रकारचे धाडसत्र सुरूच राहील, अशी माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली. गावठी दारूच्या भट्ट्यांबरोबरच अवैध धाब्यांवरही कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. उत्पादन शुल्क खात्याच्या कल्याण आणि उल्हासनगर शाखेच्या भरारी पथकांनी एकत्रितपणे ही धडक कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -