घरमुंबईवरळी येथे विनयभंग करणाऱ्या तरुणांना अटक

वरळी येथे विनयभंग करणाऱ्या तरुणांना अटक

Subscribe

वरळी येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोन तरुणांना ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे.

पहाटे सायकलवरुन जाणार्‍या एका महिलेचा विनयभंग करुन पळून गेलेल्या दोन्ही तरुणांना काही तासांत ताडदेव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. शेल्डन अल्फेड फर्नाडिस आणि राहुल विजय देसाई अशी या दोघांची नावे असून सीसीटिव्ही फुटेजवरुन या दोघांना पकडण्यात यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी सांगितले आहे. दरम्यान अटकेनंतर शेल्डनला न्यायालयीन तर राहुलला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ते दोघेही प्रभादेवीचे रहिवाशी असून त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.

नेमके काय घडले?

ताडदेव येथे राहणाऱ्या महिला त्यांच्या राहत्या घरातून शनिवारी सकाळी पाच वाजता सायकलवरुन निघाल्या होत्या. काही वेळानंतर त्या ताडदेव येथून वरळीतील रजनी पटेल चौक येथे आल्या. त्यावेळी तेथून बाईकवरुन जाणार्‍या दोन तरुणांनी त्यांच्याकडे अश्लील हावभाव करुन त्यांच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग करुन ते दोघेही बाईकवरुन पळून गेले. या घटनेनंतर तिने ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली, त्यात पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या पथकातील उमेश कदम, थोरात, पडवाळे, टेकवडे व गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी प्रभादेवी येथून शेल्डन फर्नाडिस आणि राहुल देसाई या दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस तपासात ते दोघेही प्रभादेवी परिसरात राहत असून शनिवारी ते वरळी येथे बाईकवरुन गेले होते. यावेळी या दोघांनीच या महिलेचा विनयभंग केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांना विनयभंगाच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी राहुलला पोलीस तर शेल्डनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – योगा क्लास सोडला म्हणून शिक्षकाने केला विनयभंग

वाचा – लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करुन भावाला मारहाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -