घरमुंबईझुंडशाहीच्या आंदोलनाला कुलगुरूंनी बळी पडू नये

झुंडशाहीच्या आंदोलनाला कुलगुरूंनी बळी पडू नये

Subscribe

सोमण यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी

कोणतही कारवाई करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन नैसर्गिक न्याय द्यावा लागतो. त्यामुळे कोणीतरी झुंड शाहीच्या मार्गाने आंदोलन करत असेल तर कुलगुरूंनी त्याला बळी पडू नये असे स्पष्ट करत मुक्ता शिक्षक संघटनेने अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमण यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई विद्यापीठात शिक्षकांशी प्रलंबित अनेक प्रश्न आम्ही मांडले आहेत. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परंतु, कोणीतरी झुंडशाहीच्या मार्गाने आंदोलन करून दबाव आणत आहे. त्या दबावाला बळी पडून कुलगुरू सोमण यांच्यासारख्या एखाद्या शिक्षकाची कारकीर्द पणाला लावत आहेत. कुलगुरू हे स्वतः उत्कृष्ट प्राचार्य होते. त्यामुळे कारवाईपूर्वी समोरच्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी हे त्यांना चांगलेच माहीत आहे. सावरकरांविषयी अपशब्द बोलल्यानंतर सोमण यांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ काहींच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी आंदोलन केले. व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करणार्‍या या दिखाऊ मंडळींचा चेहरा या निमित्ताने उघड झाला. त्यामुळे सोमण यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात यावी अशी विनंती मुक्ता संघटनेतर्फे करण्यात आली.

- Advertisement -

झुंडशाहीने आंदोलन करताच कुलगुरूंनी त्यांना शरण जाऊन सोमण यांच्यावर कारवाई केली. पण, प्रलंबित वेतन असणार्‍या तासगावकर कॉलेजप्रमाणे अनेक कॉलेजमधील शिक्षकांबाबत कुलगुरू ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कुलगुरूंनी कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय घ्यावा व सोमण यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अन्यथा आम्हाला देखील आमच्या प्रलंबित प्रश्नांवर आंदोलन करावे लागेल असा इशारा संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -