घरताज्या घडामोडीअल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात लोटणाऱ्या टोळीला अटक

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात लोटणाऱ्या टोळीला अटक

Subscribe

पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका करून याप्रकरणी एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

आई तुरुंगात गेल्यामुळे एकट्या राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पैसांचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसायात लोटण्यात आल्याचा संतापजनक प्रकार कुर्ला पश्चिम बैल बाजार या ठिकाणी नुकताच उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका करून याप्रकरणी एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

मानखुर्द परिसरात राहणारी १४ वर्षाची मुलीची आई  मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे, आई तुरुंगात असल्यामुळे एकट्या राहणाऱ्या मुलीचे खाण्यापिण्याचे हाल होत होते. तीच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत कुर्ला पश्चिम बैलबाजार येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने तीला पैशाचे आमिष दाखवत तीला बळजबरीने वेश्याव्यवसायात लोटले होते.

- Advertisement -

या कृत्यात या महिलेचा भाऊ दलाल बनून या मुलीला ग्राहकांना पोहचवण्याचे काम करीत होता. या मुलीसह आणखी एका अल्पवयीन मुलीला या भाऊ बहिणीने बळजबरीने वेश्याव्यवसायात लोटले होते. तीन दिवसांपूर्वी या दोघी कल्याण मध्ये एका संस्थेच्या हाती लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या संस्थेने या मुलीकडे चौकशी केली असता बळजबरीने आमच्याकडून हे कृत्य करून घेतले जात होते, आम्ही नकार दिल्यास आम्हाला मारहाण करण्यात येत होती, तसेच आमचे अश्लील व्हिडीओ देखील काढण्यात आले असल्याचे या सुटका करण्यात आलेल्या या मुलींनी तक्रारीत म्हटले आहे. या संस्थेने कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर पोलिसांशी संपर्क साधून या दोन्ही मुलींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विनोबा भावे नगर पोलिसांनी या मुलींची तक्रार दाखल करून एका महिलेसह चार जणांना कुर्ला बैल बाजार येथून अटक करण्यात आली आली असून त्यांच्या विरुद्ध पोक्सो, पिटा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही मुलीची रवानगी महिला बालसुधारगृहात करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघेजण ग्राहक असल्याची माहिती पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -