घरमुंबईठाण्यात गैरहजर फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण

ठाण्यात गैरहजर फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण

Subscribe

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाला सर्वेक्षणाच्यावेळी काही कारणास्तव गैरहजर असलेल्या व सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय करण्यात येणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मात्र, ज्या फेरीवाल्यांचे यापूर्वी सर्वेक्षण झालेले आहे. अशा फेरीवाल्यांना पुन्हा सर्वेक्षण करण्याची गरज नाही.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियमातील तरतुदीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेकडून पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सन 2016 मध्ये त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचे वेळी काही कारणास्तव गैरहजर असलेल्या अथवा सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे, असे ठाणे महानगरपालिका व शहर फेरीवाला समितीच्यावतीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समिती निहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले नाही, अशा फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी व्यवसायाच्या ठिकाणीच नोंदणी फॉर्म देण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यक्तीश: उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी फॉर्म फी रु.100/- फॉर्म देताना घेण्यात येणार असून प्रत्यक्ष नोंदणीची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देताना रु.900/- नोंदणी फी घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -