Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम चोरीसाठी सेल्स टॅक्स अधिकाऱ्याचा गळा चिरला!

चोरीसाठी सेल्स टॅक्स अधिकाऱ्याचा गळा चिरला!

Related Story

- Advertisement -

बेलापूर येथील कार्यालयातून घरी निघालेल्या सेल्स टॅक्स अधिकाऱ्याला दोन चोरट्यांनी वाटेत अडवले. त्यानंतर त्यांच्या गळ्यावर वार करून लूट केल्याची खळबळजनक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई, ठाण्यात देखील सोनसाखळी, मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांची कुठलीही भिस्त या गुन्हेगारांवर राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

महेश बिनावडे (३९) असे या सेल्स टॅक्स अधिकाऱ्याचे नाव आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सेक्टर ५ येथे कुटुंबियांसह राहणारे महेश बिनवाडे हे सेल्स टॅक्स अधिकारी असून ते मुंबईतील वांद्रे येथे कार्यरत आहे. महेश बिनावडे हे गुरुवारी रात्री कामावरून घरी येत असताना बेलापुर येथील महानगरपालिका मिनी स्ट्रक्चर येथून गींग टँक या ठिकाणी जाताना दोन चोरट्यानी त्यांची वाट अडवली आणि त्यांच्याकडे पैशाचे पाकीट आणि मोबाईल फोनची मागणी केली. मात्र, महेश बिनवाडे यांनी त्यांना विरोध करताच चोरट्यांनी त्यांच्या जवळील धारदार शस्त्र काढून बिनवाडे यांच्या गळ्यावर फिरवले. त्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर वार करून त्यांच्या जवळील मोबाईल फोन आणि पैशाचे पाकीट बळजबरीने घेऊन पोबारा केला.

- Advertisement -

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महेश बिनवाडे यांना उपचारासाठी वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात करण्यात आली असून त्यांना बोलता येत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांच्या नातेवाईकांनी सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा कसून शोध सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.

- Advertisement -