घरमुंबईकल्याणमध्ये चोरट्यांनी भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखोची कॅश लुटली

कल्याणमध्ये चोरट्यांनी भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखोची कॅश लुटली

Subscribe

पेट्रोल पंपाचा कर्मचारी मुरबाड रोडवरील फूटपाथवरून पायी जात असताना, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्या कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हातातील रोकड असलेली  बॅग हिसकावून पळ काढला.

कल्याणमध्ये चोरी, घरफोडी आणि हाणामारीच्या घटना दिवसागणिक घडत असतानाच आता दिवसाढवळया लुटमारीच्या घटना घडत असल्याने खळबळ उडाली आहे.  बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जाणारी पेट्रोल पंपाची सुमारे साडेबारा लाखाची कॅश लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार भरदिवसा कल्याणात घडला आहे. या प्रकारामुळे पोलिसांपुढं मोठ आव्हान उभे ठाकले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरात बिर्ला कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावर हा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाची सुमारे साडेबारा लाखाची रोकड बँकेत भरण्यासाठी पेट्रोल पंपाचा कर्मचारी हा सकाळच्या सुमारास मुरबाड रोडवरील फूटपाथवरून पायी जात असताना, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्या कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हातातील रोकड असलेली  बॅग हिसकावून पळ काढला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह इतर संबंधित पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी आजूबाजूच्या इमारतींच्या सीसी टिव्ही फुटेज तपासणीसाठी घेतले असून तपासाला सुरूवात केली आहे. शहरात दिवसा ढवळ्या आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -