घरमुंबईअभिनेत्रीला धमकीसह अश्लील मॅसेज

अभिनेत्रीला धमकीसह अश्लील मॅसेज

Subscribe

एका अभिनेत्रीला तिच्याच सहकाऱ्यांनी धमकीसह अश्लील मॅसेज केल्याची घटना अंधेरी येथे घडल्याचे समोर आले आहे.

समाजसेविका असलेल्या एका भोजपुरी अभिनेत्रीला धमकीवजा अश्लील मॅसेज पाठवून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच सचिंदरनाथ सुरेंद्रनाथ दुबे या ४३ वर्षाच्या एडीटर सहकारी कर्मचार्‍याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची अंधेरीतील लोकल कोर्टाने पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सहकारी कर्मचार्‍याची जामिनावर सुटका

ही भोजपुरी अभिनेत्री ३५ वर्षाची समाजसेविका असून ती एक एनजीओ देखील चालवित आहे. ही अभिनेत्री जखमी पक्षी-मांजरावर उपचार तसेच कुत्र्यांना अन्न देण्याचे काम करते. त्यांच्यासोबत इतर सातजण असून त्यात सचिंदरनाथ दुबे या आरोपीचा देखील समावेश होता. या दोघांनी तीन भोजपुरी चित्रपटात काम केल्याने त्यांची चांगली ओळख होती. या ओळखीतून ते दोघे चांगले मित्र झाले होते. तसेच ही महिला एनजीओ चालवित असल्याने सचिंदरनाथ तिच्यासोबत दोन वर्षांपासून काम करत होता. काही दिवसांपासून तो त्यांना अश्लील मॅसेज पाठवून धमकावित होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवसांपूर्वी याच कारणावरुन त्याने एनजीओच्या एका कर्मचार्‍याला मारहाण केली होती. त्यानंतर तिला सतत धमकीवजा मॅसेज पाठवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर सचिंदरनाथ दुबे आरोपी त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने त्याला पंधरा हजार रुपयांचा जामिन मंजूर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महिलेला अश्लिल ‘व्हाट्सअॅप-मेसेज’ पाठवणा-यांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -