घरमुंबईमेट्रो कर्मचाऱ्यांकडून हफ्ता वसुली करणाऱ्याला अटक

मेट्रो कर्मचाऱ्यांकडून हफ्ता वसुली करणाऱ्याला अटक

Subscribe

कांदिवलीतील चारकोप परिसरात मेट्रो कर्मचाऱ्यांकडून ‘प्रोटेक्शन मनीच्या’ नावाखाली हफ्तावसुली करणाऱ्या तीघांविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा नोदंवला आहे. यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनंतर इतर दोन आरोप फरार झाले आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चारकोप परिसरात मेट्रो २ A प्रकल्पाचे काम सुरु असून खोदकाम करणारे कामगार कार्यरत आहेत. ६ जून रोजी तीघांनी येथे काम करत असलेल्या कामगरांना धमकावले व काम बंद करण्यासाठी सांगितले. काम पुन्हा सुरु करण्यासाठी ‘प्रोटेक्शन मनी’ची मागणी त्यांनी केली होती.

- Advertisement -

” मी सुट्टीवर असताना मला चारकोप येथून कामागरांचा फोन आला. काही लोक आपल्याला मारत असल्याचे त्यांनी फोनवरुन सांगितले. माहिती मिळताच मी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहचल्यावर तीघजण कामगारांना धमकावत असल्याचे दिसून आले. मोहम्मद आलम आणि बद्रुल शेख या दोन्ही कामगारांना या तीघांनी मारहाण केली होती. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली.” – साईट सुपरव्हायझर, राहेश्य तिवारी

साईट सुपव्हायझरने या बाबत चारकोप पोलिसांकडे तक्रार केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर यातील दोघांनी पळ काढला तर संदिप अहिरे याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. संदिप विरोधात कलम ३२४(मारहाण करुन दुखापत), ३८६ (खंडणी), ५०४ (हेतूने अपमान करणे) या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी नोंदवून घेतलेल्या तक्रारीनुसार संदिप मागील काही महिन्यांपासून खंडणी मागत होता. १८ एप्रिल रोजी राहेश्य ज्यावेळी लिंक रोड येथे काम करत होता त्यावेळी संदिपने त्याच्या जवळ पैशाची मागणी केली होती. मात्र संदिपने त्याला पैसे न दिल्याचा राग मनात धरुन त्याने कामगारांना मारहाण केल्याचे राहेश्यने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -