घरदेश-विदेशश्रीनगर येथील दहशतवादी हल्ल्यांत संपादकासह तीन जणांचा मृत्यू

श्रीनगर येथील दहशतवादी हल्ल्यांत संपादकासह तीन जणांचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांनी सैन्यांना लक्ष्य केलं होतं. मात्र आता दहशतवाद्यांनी थेट काश्मिरमधल्या एका वृत्तपत्राच्या संपादकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वृत्तपत्र संपादकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत गाडीत असलेले ड्राईव्हर आणि पीएसओ गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही उपाचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

असा केला बुखारी यांच्यावर हल्ला

जम्मू-काश्मीरच्या रायझिंग कश्मिर या वृत्तपत्राचे संपादक सुजात बुखारी यांना आज दहशतवाद्यांनी टार्गेट केलं. श्रीनगर येथील प्रेस कॉलनीमध्ये दहशतवाद्यांनी आज संध्याकाळी शुजात बुखारी यांच्यावर हल्ला केला. शुजात बुखारी लाल चौक येथील त्याच्या ऑफिसमधून इफ्तार पार्टीसाठी जात होते. त्यावेळ बुखारी यांच्या गाडीला अडवून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पीएसओ आणि ड्राईव्हर गंभीर जखमी झाले. या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

दहशतवाद्यांचा शोध सुरु

चार दहशतवाद्यांनी शुजात बुखारी यांच्या गाडीला लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. संपूर्ण परिसर पोलिसांनी घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. २००० मध्ये बुखारी यांच्यावर असाच हल्ला झाला होता. त्या हल्ल्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

महबूबा मुफ्तींनी घटनेचा केला निषेध

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. शुजात बुखारी यांच्या हत्येवर त्यांनी शोक व्यक्त केलाय. महबूबा मुफ्ती यांनी या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, “शुजात बुखारी यांच्या अचानक जाण्याने खूप दु:ख झाले. ईदच्या पूर्वी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. आम्ही या घटनेचा तिव्र निषेध करतो. माझ्या भावना बुखारींच्या कुटुंबियांसोबत आहे”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -