घरमुंबईबोईसरजवळ रेल्वेरूळ ओलांडताना आईसह दोन मुलांचा मृत्यू

बोईसरजवळ रेल्वेरूळ ओलांडताना आईसह दोन मुलांचा मृत्यू

Subscribe

बोईसर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला आहे. बोईसर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खैराफाटक पुलाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीने तिघांना उडवले. या अपघातात आईसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यात आठ महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. तर मुलगी चार वर्षांची होती. मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही. या पुलानजीक अपघात घडण्याची ही जवळपास सहावी घटना आहे. अपघात नेमका कसा झाला, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

या आधीही अनेकवेळा बोईसर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खैराफाटक पुलाजवळ अनेकदा अपघात झाले आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -