घरमुंबईकल्याण डोंबिवलीत सापांचा सुळसुळाट; एकाच दिवशी तीन साप पकडले

कल्याण डोंबिवलीत सापांचा सुळसुळाट; एकाच दिवशी तीन साप पकडले

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून कल्याण -डोंबिवलीमध्ये सापांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सापांच्या भितीने कल्याण डोंबिवलीकरांची झोपच उडाली आहे.

मानवी वस्तीत साप शिरण्याचे प्रकार वाढले असून कल्याण डोंबिवलीत एकाच दिवशी तीन साप पकडले आहेत. सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण केल्यानंतर त्यांनी हे साप पकडून जंगलात सोडले आहेत. यामध्ये कोब्रा नागाचाही समावेश आहे. दोन महिन्यांपूर्वीच डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली परिसरात राहणारी स्वरा वाघमारे या सहा वर्षीय बालिकेचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे सापांच्या भितीने कल्याण डोंबिवलीकरांची झोपच उडाली आहे.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील सागाव येथील इंप्रेस मॉलमध्ये ७ फूटाची धामण शिरल्याने खळबळ उडाली. तसेच कल्याण डंपिंग ग्राऊंड परिसरात एका ठिकाणी असलेल्या पाईपमध्ये ८ फूट लांबीची धामण लपून बसली होती. कल्याण सिंडीकेट परिसरातील पौर्णिमा टॉवर येथील एका सुरक्षा रक्षकाच्या रूमध्ये साडेतीन फुटाचा क्रोबा पकडण्यात आला. कल्याण डोंबिवली एकाच दिवशी तीन विविध ठिकाणांहून हे साप पकडण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच कल्याण पश्चिमेतील राम मारूती मंदिर परिसरात राहणारे योगेश राजे यांच्या घराच्या दरवाजापाशी साप बसला होता. दरवाजा बंद असल्याने तो घरात शिरण्याच्या बेतात होता. मानवी वस्तीमध्ये येणा-या सापांना पकडून त्यांना जंगलात सोडण्याचे काम सर्पमित्र करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -