घरमुंबईराज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर

राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर

Subscribe

सातवा वेतन आयोगाच्या मागणीवरुन आजपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहे. १७ लाख कर्मचारी आजपासून संपवार जाणार असून तीन दिवस हा संप असणार आहे.

सातवा वेतन आयोगाच्या मागणीवरुन राज्य सरकार पोकळ आश्वासन देत आहेत. ठोस निर्णय घेत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. सातवा वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचारी संपावर ठाम असून त्यांनी आजपासून तीन दिवसांचा संप पुकारला असून या संपात राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सहभाग घेणार आहे. या संपात मंत्रालयातील कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा, जुन्या निवृत्तिवेतन योजनेत सुधारणा व्हाव्यात या मागण्या केल्या आहेत. या कर्मचाऱ्याच्या संपात सहभागी होऊ नये असा सरकारने अध्यादेश देखील काढला आहे. या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनवर राज्य सरकार कारवाई करेल असा सरकारने आदेश दिला आहे.

- Advertisement -

वाचा : राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसाच्या संपावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -