लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार

man arrested for raping girl

भिवंडी शहरातील गैबी नगर, खान कंपाऊंड येथील टेलरिंगचे काम करणाऱ्या २४ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. वसई रोडवरील निनाद लॉजवर नेवून तिच्यावर हे अत्याचार करण्यात आले. या नंतर तरूणी गरोदर राहिली आहे.

या प्रकरणी अत्याचारी आसिफ खान ( २४ रा.भंडारी चौक ,दिवांशाह दर्गा ) याच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.त्याने त्याने मोबाईलवरून ओळख झालेल्या टेलरिंगचे काम करणाऱ्या २४ वर्षीय युवतीशी जून २०१८ पासून प्रेम संबंध प्रस्थापित केले होते.

या दरम्यान त्याने वसई रोडवरील निनाद लॉज व पिडीत युवतीच्या घरी जाऊन वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या दरम्यान युवती तीन महिन्यांची गरोदर राहिल्याने तिने आसिफ याच्याकडे लग्न करण्यासाठी विचारणा केली.मात्र त्याने लग्नास नकार देवून तो तिला टाळू लागला व समाजात आपली बदनामी नको यासाठी प्रथम गर्भपात करू व त्यानंतर निकाह करू असे खोटे सांगून तीला गर्भपात करण्यासाठी गोळ्या खाण्यास दिल्या.त्याच्यावर विश्वास ठेवून पिडीत युवतीने सदरच्या गोळ्या प्राशन केल्याने तिचा गर्भपात झाला. मात्र तिच्या गर्भपातानंतर त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली. संपर्क करूनही प्रियकर आपल्याला सहकार्य करत नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात जावून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण अत्याचारी आसिफ यास लागताच तो फरार झाला असून त्याचा शोध तपास अधिकारी एपीआय दुर्गेश दुबे करीत आहे.