घरमुंबईMega Block: ट्रान्सहार्बर मार्गावर 'या' वेळेत असणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Mega Block: ट्रान्सहार्बर मार्गावर ‘या’ वेळेत असणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Subscribe

ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून शनिवारी म्हणजे २६ मार्चला रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री घोषित करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ०५.४५ वाजेपर्यंत असणार आहे.

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या ठाणे-वाशी अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गांवर शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ०५.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान भुयारी मार्गासाठी आरएच गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे.

- Advertisement -

या ट्राफिक ब्लॉकमुळं शनिवारी रात्री ११.३२ ते ११.४५ यावेळेत आणि रविवारी सकाळी ५ ते ०५.५३ वा. यावेळेत ठाणे येथून वाशी-नेरुळ-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन सेवा रद्द असणार आहेत. तसंच पनवेल-नेरुळ-वाशी येथून शनिवारी रात्री ११.०९ ते रविवारी सकाळी ०५.२९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप सेवा रद्द असतील.


हेही वाचा – गुढी पाडव्याच्या निमित्तानं एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे – अनिल परब

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -