घरमुंबईलहान मुलांमध्ये बळावतोय क्षयरोग

लहान मुलांमध्ये बळावतोय क्षयरोग

Subscribe

लहान मुलांमध्ये क्षयरोगाचं नेमकं किती प्रमाण आहे? याबाबत विचारणा केली असता आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तर दिलं आहे.

लहान मुलांमध्ये क्षयरोग वाढत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. धारावी परिसराच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्वाद्वारे लहान मुलांमध्ये क्षयरोगाचं नेमकं किती प्रमाण आहे? याबाबत विचारणा केली होती. त्यावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तर दिलं आहे. डॉ. दीपक सावंत यांनी त्यांच्या लेखी उत्तरात लहान मुलांमध्ये क्षयरोग बळावत असल्याचं मान्य केलं आहे.

वर्षा गायकवाडांनी केले प्रश्न उपस्थित

वर्षा गायकवाड यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातील आरोग्य व्यवस्थापना (एचएमआईएस) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात १ हजार ७०९ लहान मुलांना क्षयरोगाची लागण झाली असून त्यामध्ये मुंबई, पालघर आणि ठाणे या तीन जिल्ह्यातील मुलांची संख्या जास्त असल्याची माहितीही विधानपरिषदेत मांडली. तसंच राज्यात प्रतिवर्षी सुमारे १ लाख ७५ हजार नव्या क्षयरुग्णांची नोंद केली जाते यावरही विचारणा करण्यात आली होती.

- Advertisement -

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं उत्तर

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उत्तर देताना २०१८ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच राज्यात १५ वर्षाखालील २ हजार ४३० मुलांना क्षयरोगाचे लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यापैकी ६०३ बालके ही मुंबईतील असून ४४० बालके ही ठाणे आणि पालघर जिल्हयातील आहे. याबाबत शासनाने सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लहान मुलांमधील क्षयरोगासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. क्षयरोग बाधित रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची तपासणी कार्यक्रमांतर्गंत केली जाते. त्यात १५ वर्षांखालील बालकांची देखील क्षयरोगासाठी तपासणी केली जाते. क्षयरोगग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार केले जात असल्याचं ही डॉ. दीपक सावंत यांनी त्यांच्या लेखी उत्तरात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे हा आकडा ही लवकरच कमी होईल अशी शक्यता ही वर्तवली आहे.

क्षयरोग पसरण्याची कारणे 

  • क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे विषाणू श्वसनाद्वारे पसरतात
  • घरातील प्रौढ व्यक्तींना क्षयरोग असल्यास त्या घरातील लहान मुलांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते
  • लहान मुलांमध्ये कुपोषण, एच. आय. व्ही बाधित मूल, दाट लोकवस्ती, लहान घरात मोठे कुटुंब
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -