घरमुंबईतुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह

तुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह

Subscribe

वसईतील 28 गावांचा समावेश,दगडखाणी, वीटभट्टयांना बंदी,आदेशाची तात्काळ अंमलबजावणी

वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किलोमीटर परिसराला इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये वसई तालुक्यातील 28 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यापरिसरात आता वीटभट्ट्या आणि दगडखाणींवर बंदी घालून गौणखनिज शुल्क वाहतूक परवाने तात्काळ रद्द करण्यात आले आहे.

वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवतालचे क्षेत्र इको सेन्सेटीव्ह झोन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या आदेशानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने अधिसूचना काढून सर्व राज्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे मुख्य वनसंरक्षक व संचालकांनी तुंगारेश्वर अभयारण्य इको सेन्सेटीव्ह झोन जाहिर करण्याची प्रक्रिया सुुरु केली आहे.

- Advertisement -

त्यासाठी वसईच्या प्रांताधिकार्‍यांनी आदेश काढून तुंगारेश्वरच्या चारही बाजूंने 100 मीटरपासून चार किलोमीटरपर्यंतचा परिसरांचा इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये समावेश केला आहे. तसेच यापरिसरातील दगडखाणी व वीटभट्टया तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गोणखनिज शुल्क वाहतूक परवाने तात्काळ रद्द करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संंबंधित तलाठ्यांना दिले आहेत.

यापुढे इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये समावेश करण्यात आलेल्या 28 गावांमध्ये स्थापत्य व तत्सम कामांसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. यागावांमध्ये आता वीटभट्टया, दगड खाणी, दगड खाणपट्टे, दगड परवाने, मुरुम उत्खनन यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुंगारेश्वर परिसरात असलेल्या गावांमध्येच विटभट्टया आणि दगडखाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात आल्याने अनेकांना त्याचा फटका बसणार आहे.

- Advertisement -

इको सेन्सेटीव्ह झोनमधील गावे
1) पारोळ, 2) माजिवली, 3) तिल्हेर, 4) खार्डी, 5) नागला, 6) शिलोत्तर, 7) पोमण, 8) कामण, 9) देवदळ, 10) चिंचोटी, 11) कोल्ही, 12) चंद्रपाडा, 13) टिवरी, 14) राजावली, 15) गोखीवरे, 16) सातीवली, 17) वालीव, 18) पेल्हार, 19) खैरपाडा (जुना कणेर), 20) शिरगांव, 21) दहिसर, 22) टोकरे (जुना कणेर), 23) कणेर, 24) शिरसाड, 25) मांडवी, 26) चांदीप, 27) शिवनसई, 28)उसगाव.

तुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -