घरमुंबईडॉ. कटके प्रकरण ट्विस्ट - मध्यवर्ती मार्डचा माफीनामा

डॉ. कटके प्रकरण ट्विस्ट – मध्यवर्ती मार्डचा माफीनामा

Subscribe

निवासी डॉक्टरांचा प्रोफेसर आणि विभाग प्रमुख यांच्याकडून मानसिक छळ करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याविरोधात मध्यवर्ती मार्डकडून ही तक्रार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. कटके यांनी या तक्रारीवर आक्षेप घेत अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यावर मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी डॉ. कटके यांच्याकडे पत्राद्वारे माफी मागितली असल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय परिक्षेत पास करण्यासाठी प्रोफेसर डॉक्टरांकडून निवासी डॉक्टरांकडे पैशांची अथवा कुठलीही मागणी होत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांची मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून मागच्या आठवड्यात करण्यात आली होती. या तक्रारीत डॉ. राजश्री कटके यांचे नाव प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता. पण, या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले असून रविवारी रात्री उशिरा मध्यवर्ती मार्ड अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी माफीनामाच सादर केला आहे. त्यामुळे, या प्रकरणातील गंभीरता अधिक वाढली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ

प्रोफेसर आणि विभाग प्रमुख निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याविरोधात मध्यवर्ती मार्डकडून ही तक्रार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. डॉ. राजश्री कटके यांनी या तक्रारीवर आक्षेप घेत अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यावर मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी डॉ. राजश्री कटके यांच्याकडे पत्राद्वारे माफी मागितली आहे.

- Advertisement -

एका डॉक्टर विद्यार्थिंनीच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती मार्डचा अध्यक्ष या नात्याने संचालकांना वैद्यकीय शिक्षण संचालनायाला ही तक्रार पत्राने कळवली होती. सोपस्कारानुसार हे सगळे घडले. ही तक्रार करण्याआधी कोअर कमिटी आणि मध्यवर्ती मार्डच्या सदस्यांना विचारात न घेता डॉ. कटके यांच्या चौकशीची मागणी केली. या पत्रामुळे डॉ. कटके यांचा वृत्तामधून प्रतिमा डागाळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माझ्याकडून चूक झाली असल्याचे कबुल करत असून माफीनामा सादर करण्यात आला आहे.  डॉ. लोकेश चिरवटकर, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड


हेही वाचा – डॉ. राजश्री कटकेंवर २१ दिवसांच्या आत कारवाईची मार्डकडून मागणी

- Advertisement -

हेही वाचा – डॉ. राजश्री कटके पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मानसिक छळ केल्याचा डॉक्टरांचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -