घरदेश-विदेशजैश-ए-मोहम्मद संघटनेच्या संपर्कात काश्मिरी तरूण

जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या संपर्कात काश्मिरी तरूण

Subscribe

दोन कश्मिरी तरूणांना उत्तर प्रदेशातील देवबंद येथून अटक करण्यात आली होती. त्या दोन्ही तरूणांनी आम्ही जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या वरिष्ठांशी सातत्याने संपर्कात असल्याची कबुली दिली आहे.

जम्मू काश्मीर पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशदवादी हल्लामध्ये ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या हल्लानंतर काही दिवसांनी उत्तर प्रदेशातून दोन काश्मिरी तरूणांना अटक करण्यात आली होती. त्या तरूणांनी पुलावामा हल्लाचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी आणि जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होतो, अशी कबुली दिली आहे. पुलवामा हल्लानंतर ही संघटना एका मोठ्या दहशतवादी हल्लाचा बेत आखत होती. अशी माहितीही त्या तरूणांकडून मिळाली आहे.

काश्मिरी तरूणांनी दिली कबुली

या दोन काश्मिरी तरूणांना उत्तर प्रदेश, सहारनपूर जवळील देवबंद येथून अटक करण्यात आली होती. शहनवाझ तेली आणि आकिब मलिक अशी या कश्मीरी तरूणांची नावं आहेत. त्यांचे मोबईल तापासाल्यानंतर त्यातून काही वॉईस मॅसेजमध्ये बडा काम आणि सामान, असे शब्द वापरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केलेल्या या दोघांच्या चौकशीनंतर असे लक्षात आले की, शाहनवाझ हा दीड वर्षांपासून तर आकिब सहा महिन्यांपासून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या वरिष्ठांशी हे दोघे सातत्याने संपर्कात होते. तसेच काश्मिरमध्ये जाऊन जैशच्या सैन्यात भरती होण्याच्या तयारीत होते, असे त्यांच्या कबुलीतून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हल्ल्यात सहभागाची चौकशी

शाहनवाझ तेली आणि आकिब मलिक या दोन्ही तरूण बीबीएमच्या सोशल मीडिया माध्यमातून जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या संपर्कात होते. शाहनावाझ बी. ए प्रथम वर्षाला आहे तर आकिबानेबारावीची परीक्षा दिली आहे. संपर्कात असल्याच स्पष्ट झाले पण पुलवामा हल्ल्यात त्यांचा हात आहे का? याचा उत्तर प्रदेश एटीएस तपास घेते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -