घरमुंबईविदेशी कंपनीला 89 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या दोघांना अटक

विदेशी कंपनीला 89 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या दोघांना अटक

Subscribe

मुंबई : हर्बल प्रोडक्टच्या नावाने एका विदेशी कंपनीला सुमारे 89 लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यात एका विदेशी नागरिकाचा समावेश असून या दोघांना अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयगणेश मोहन पठ्ठे आणि आयकेब ओकोरोके अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने मुंबईसह अन्य राज्यात अशाच प्रकारे फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

८९ लाख ट्रान्सफर

यातील तक्रारदार एका विदेशी कंपनीत सल्लागार म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीला औषध बनविण्यासाठी एक्वाफेरा या हर्बल प्रोडेक्टची गरज होती. याच दरम्यान त्यांना जुलै महिन्यांत एका अज्ञात व्यक्तीने मेल केला होता. हा मेल जीटीबी फार्मास्टिकल कंपनीकडून आला होता, त्यात त्यांना गरज असलेल्या हर्बल प्रोडेक्टची आपण पुरवठा करु असे नमूद करण्यात आले होते. याच मेलमध्ये त्यांना विविध बँक खात्यात हर्बल प्रोडेक्टसाठी पैसे जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही रक्कम जमा होताच त्यांना काही दिवसांत संबंधित प्रोडेक्ट पाठविले जाईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्या बँक खात्यात सुमारे 89 लाख रुपये ट्रान्सफर केले होते.

- Advertisement -

फसवणूक करणारी सराईत टोळी

मात्र दिलेल्या मुदतीत आरोपींनी त्यांच्या कंपनीला हर्बल प्रोडेक्टचा पुरवठा केला नाही. अज्ञात व्यक्तींनी आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा दाखल होताच मंगळवारी जयगणेश पठ्ठे आणि आयकेब ओकोरोके या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात या दोघांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने मुंबईसह पंजाब आणि दिल्लीतील काही कंपन्यांना अशाच प्रकारे लाखो रुपयांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -