घरमुंबईमुलुंड चेकनाक्यावर दोन लेन वाढणार

मुलुंड चेकनाक्यावर दोन लेन वाढणार

Subscribe

पूर्व उपनगरामध्ये मुंबईचे प्रवेशद्वार असणार्‍या मुलुंड चेकनाक्यावर लेन वाढवण्यासाठीचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महापालिका यांच्यामध्ये याबाबतचा पत्रव्यवहार सुरू झाला आहे. सध्याच्या टोल नाक्यावरील लेनमध्ये आणखी दोन लेनचा समावेश करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. त्यामुळे सध्याच्या ९ लेनमध्ये आणखी २ लेनची भर पडत ही संख्या ११ होणार आहे.

मुंबई महापालिकेने अतिरिक्त दोन लेनसाठी जागा करून द्यावी अशी विनंती एमएसआरडीसीने मुंबई महापालिकेला केली आहे. मुलुंड टोल नाक्यावर मुंबई दिशेने जाणार्‍या दिशेला तसेच ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या दिशेला असा दोन्ही बाजूला लेन वाढवण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. दोन्ही बाजूला सध्याच्या सर्व्हीस रोडचा वापर हा लेनसाठी करता येईल असा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. दररोज ९७ हजार वाहने मुलुंड टोलनाक्याचा वापर करत ये-जा करतात. जास्त गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी पाहता अधिक लेन वापरता येतील का, यासाठी एमएसआरडीसी महापालिकेशी चर्चा करत आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जागा वापरायला मिळेल का ? अशीही विचारणा एमएसआरडीसीकडून मुंबई महापालिकेला करण्यात आली आहे.

- Advertisement -

ठाण्याच्या दिशेने टोलनाक्यावरून निघणार्‍या गाड्या या पुन्हा रेल्वेच्या अरूंद ब्रिजच्या ठिकाणी अडकतात. त्यामुळेच मेट्रो प्रकल्पाच्या कामांतर्गत रेल्वे ब्रिजच्या विस्तारीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्याचा ठाण्याच्या दिशेने निर्माण होणार वाहतुकीचा बॉटलनेक फोडणे शक्य होईल. टोलनाक्यावर सध्याच्या मर्यादित लेनमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. पीक अवर्समध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जास्त लेन गरजेच्या असल्याची प्रतिक्रिया एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -