घरमुंबईउद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ घेणार शपथ

उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ घेणार शपथ

Subscribe

राष्ट्रवादीकडून आज फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच शपथ घेणार आहेत तर अजित पवार हे मात्र आज शपथ घेणार नाही...

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून गुरूवारी आज महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आज मुंबईतील दादर येथे असणाऱ्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपद कोणाला दिले जाणार या वरून राष्ट्रवादीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावे यासाठी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. परंतु राष्ट्रवादीचे अजित पवार हे आज शपथ घेणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ठरले आहे तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे आज शपथ घेतील. तसेच काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देखील मंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी असे सांगितले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने आजचा दिवस खूप मोठा आहे. मागील काळात राष्ट्रवादीसमोर असंख्य अडचणी आणि संकटे आलीत, मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे आम्ही यातून बाहेर पडलो. विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती. ज्यांना सत्ता स्थापनेचा जनादेश मिळाला होता, त्यांना काही कारणांमुळे सत्ता स्थापन करता आली नाही. यानंतर शिवसेनेने केलेल्या वेगळ्या विचाराचे स्वागत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे, याचा मला आनंद आहे.’


हेही वाचा- LIVE : राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -