घरताज्या घडामोडीलोअर परळ पुलावर यु-टर्न मारताना झालेल्या अपघातात २ दुचाकी स्वारांचा मृत्यू, कार...

लोअर परळ पुलावर यु-टर्न मारताना झालेल्या अपघातात २ दुचाकी स्वारांचा मृत्यू, कार चालकला अटक

Subscribe

मुलाची तब्येत बिघडली म्हणून माघारी फिरण्यासाठी पुलावरुनच यु-टर्न घेतला

लोअर परळ (Lower Parel) येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) समोरील पुलावर काल रात्री एक विचित्र अपघात झाला. कार चालकाच्या चुकीमुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. लोअर परळ पुलावर एक कार रिव्हर्स घेत असताना अचानक समोरुन आलेल्या एका दुचाकी कारला धडकली आणि समोरच्या लेनवरुन येणाऱ्या आणखी एका दुचाकीवर जाऊन आदळली. त्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दोन्ही दुचाकी स्वार पुलावर विचित्ररित्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाचा पोलिसांकडून कसून शोध सुरु होता. अखेर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित कुमार असे कार चालकाचे नाव आहे. तो अंधेरी येथे राहणारा असून तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करतो. बुधवारी रात्री तो मित्राला भेटण्यासाठी फिनिक्स मॉलच्या दिशेने जात होता. सेनापती बापट मार्ग उड्डाणपूल येथून जात असताना अचानक त्याला पत्नीचा फोन आला आणि तीने मुलाची तब्येत बिघडली म्हणून सांगितले. म्हणून त्याने माघारी फिरण्यासाठी पुलावरूनच यु-टर्न घेत असताना सुसाट वेगात येणाऱ्या मोटारसायकल कारवर धडकून अपघात झाला.

- Advertisement -

घटनेनंतर कार चालक अमित कुमार हा फरार झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कारचा शोध घेऊन शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी स्वारांची नावे भावेश संघवी (२५ वर्ष) असून तो भटवाडी घाटकोपर पश्चिम येथे राहत होता. तर दुसऱ्या दुचाकी स्वाराचे नाव कृष्णा कुडाळकर (२६ वर्ष) असून तो चेंबूर येथे राहणारा होता. अपघातानंतर दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. एकाचा जागीच मृत्यू झाला तर तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – सीझेडएमपी आराखड्याला केंद्राची मंजुरी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -