घरमुंबईमुंबई नजीक पुन्हा दोन भूकंपाचे धक्के

मुंबई नजीक पुन्हा दोन भूकंपाचे धक्के

Subscribe

सौम्य स्वरूपाचे अनेक धक्के आज मुंबई नजीकच्या परिसरात अनुभवायला मिळाले आहेत. गेल्या महिन्यातही मोठ्या प्रमाणात अशाच स्वरूपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. आज सकाळपासून झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा मुंबईपासून १०४ किमी इतका दूर होता. आज सकाळी पालघर येथे ३.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती जाहीर केली. पहाटे २.५० च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे.

- Advertisement -

पहिल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर त्यापाठोपाठ आणखी दोन सौम्य अशा स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवले. साधारणपणे २.१ आणि २.० रिश्टर स्केल अशी भूकंपाची तीव्रता होती. पहाटे ४.१२ वाजता पहिला धक्का जाणवला तर त्यापाठोपाठ ५.४९ वाजता दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जिवितहानी किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. याआधी सप्टेंबर महिन्यात अनेक सौम्य पद्धतीचे असे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यापैकी नाशिक आणि मुंबई नजीकच्या परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक येथे २.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तर डहाणूतील पारवाडी या भागात ३.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतरच लगेचच दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. आसाममध्येही अशाच स्वरूपाचे दोन भूकंप झाले आहेत. दोन भूकंपामध्ये एक भूकंपाची क्षमता ४.४ रिश्टर स्केल होती. तर दुसरा भूकंप ४.२ क्षमतेचा होता.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -