घरदेश-विदेशFit India Movement : पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान साधणार जनतेशी संवाद

Fit India Movement : पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान साधणार जनतेशी संवाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवार, २४ सप्टेंबर रोजी फिट इंडिया चळवळीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या देशव्यापी ऑनलाईन फिट इंडिया संवादादरम्यान फिटनेस तज्ज्ञ तसेच नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला होता. यावेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले होते. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन होत चाललो असल्याची खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने आता पाऊल उचलले आहे, असे मोदी म्हणाले होते.

हेही वाचा –

शेती विधेयकावरून सुरू असलेल्या वादावर शरद पवारांचा अन्नत्याग!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -