घरमुंबईउद्धव ठाकरेंना अयोध्येचे निमंत्रण; दसऱ्यानंतर राम मंदिराची वीट रचणार?

उद्धव ठाकरेंना अयोध्येचे निमंत्रण; दसऱ्यानंतर राम मंदिराची वीट रचणार?

Subscribe

राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्षांचे निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर राम मंदिराच्या विषयावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरीता राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष जन्मेजयशरण महाराज (रसिक पीठाधीश्वर, जानकी घाट, बडा स्थान श्री अयोध्या) यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. “अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर उभारण्यासाठी निमंत्रण देण्यास उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. शिवसेने शिवाय देशात कुठलीही शक्ती नाही, जी अयोध्येत राम मंदिर उभारू शकते. अयोध्या हा शिवसेनेचा गड आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्र रक्षणासाठी आणि धर्म रक्षणासाठी निमंत्रण स्वीकारावे”, असा आग्रह धरला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘राम मंदिराच्या बाजूला मस्जिद बांधून देणार का?’

राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष जन्मेजयशरणजींनी भेटीनंतर माहिती दिली की, उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला येण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे. दसऱ्याच्या नंतर ते अयोध्यात येतील, हे निश्चित झाले आहे. अयोध्यात भव्य राम मंदिर व्हावे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांची इच्छा ते पूर्ण करतील, असा आम्हाला राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासला विश्वास आहे. दसऱ्याच्या नंतर उद्धव ठाकरे अयोध्याला येतील आणि संतांचा आशीर्वाद घेतील. त्यानंतर तिथे सभा आयोजित केली जाईल, त्यावेळी राम मंदिर निर्मितीची तारीख जाहीर केली जाईल.

- Advertisement -

शिवसेनेन स्वामींचे आमंत्रण स्वीकारल आहे. उद्धव ठाकरे दसऱ्या मेळाव्यात अयोध्येत कधी जायचे याची तारीख जाहीर करतील. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. हे सरकार रामाच्या नावावरच निवडणून आले आहे. सरकारने अध्यादेश काढून राम मंदिर निर्मितीचा निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतील आणि त्या नंतर मंदिर निर्मितीच्या कार्याला गती मिळेल. – खासदार संजय राऊत

हे वाचा – निवडणुका जवळ आल्या… चला, चला राममंदिर बांधू!

भाजप सरकार राम मंदिर निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष जन्मेजयशरण महाराज यांनी सांगितले की, “एकदा राम मंदिर निर्मितीला प्रारंभ झाला की समुद्राला जशा सर्व नद्या येउन मिळतात. तसे सर्व पक्ष राम मंदिर निर्माण कार्यात सहभागी होतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -