घरमुंबईमनपा मुख्यालयातील सिंधी नाम फलकावरून वाद

मनपा मुख्यालयातील सिंधी नाम फलकावरून वाद

Subscribe

उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात स्थायी समिती सभापतीच्या दालनासमोर दर्शनी भागावर सिंधी नाम फलक लावल्याने वाद निर्माण झाला आहे. या नामफलका बाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून जर दोन दिवसांत मराठी फलक लावले नाहीत तर सध्या असलेल्या फलकाला काळे फसण्याचा इशारा दिला आहे.

स्थायी समिती सभापती म्हणून नुकतेच राजेश वधारीया हे निवडून आलेले आहेत, त्यांनी पदभार संभाळल्यानंतर दालनासमोर सिंधी मध्ये नामफलक लावला, या पूर्वीही मराठी भाषेला डावलून सिंधी भाषेत नामफलक लावले गेले होते मात्र त्यावेळेस मनसे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठी मध्ये नामफलक लावले गेले आहेत .या संदर्भात मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे की राज्यातील शासकिय कार्यालयात असलेले नामफलक हे दर्शनी भागात मराठी भाषेतच असले पाहिजे , याबाबत आम्ही चौकशी करून कारवाई करू.

- Advertisement -

मनसे शहरअध्यक्ष बंडू देशमुख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे , आमचा सिंधी भाषेच्या फलकला विरोध नाही मात्र मराठी भाषेला डावलण्याचा अथवा उपमर्द करण्याचा प्रयत्न होत असल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही , दोन दिवसांच्या आत जर हा फलक बदलला नाही तर आम्ही या फलकला काळे फासू असा ईशारा दिला आहे. स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांना विचारले असता ते म्हणाले की नामफलकाच्या दर्शनी भागावर सिंधी तर मागील भागावर मराठी भाषेचा वापर केला आहे , नामफलकाचा दर्शनी भाग हा मराठीतुन असला पाहिजे हे मान्य आहे , मराठी आणि सिंधी दोन्ही भाषेचा मान राखून नामफलक बनविला जाईल ,तशी सूचना मी भांडार विभागाला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -