घरमुंबईराज्याला भेडसावतेय पाणीटंचाईचे संकट

राज्याला भेडसावतेय पाणीटंचाईचे संकट

Subscribe

राज्याला भेडसावतय पाणी टंचाईचे संकट

राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती असली तरीही संपुर्ण वर्षभराच्या कालावधी कृषीपंपाच्या वीज वापरात वाढ झालेली आहे. राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडून पाण्याचा उपसा झाल्याचे समोर आले आहे. एका वर्षाच्या कालावधीत सरासरी ११ टक्क्यांनी कृषीपंपाची विजेची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात ३३ हजार २६ दशलक्ष युनिट इतकी वीज कृषीपंपधारक वीज ग्राहकांनी वापरली आहे. राज्यात एकुण ४२ लाख कृषीपंप वीज ग्राहक आहेत. राज्यात पाणी संकट असले तरीही कृषीपंपाची विजेची मागणी ही वाढलेलीच आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातही पाण्याचा उपसा वाढला आहे हे महावितरणच्या आकडेवारीतून दिसत आहे. अकोला, अमरावती, जळगाव, लातुर, नाशिक यासारख्या पाण्याचे भीषण संकट असणार्‍या भागातही पाण्याच्या उपशासाठी विजेच्या वापरात वाढ झालेली आकडेवारी आहे. महावितरणच्या अमरावती परिमंडळात कृषीपंपाचा विजेचा वापर १२.०१ टक्क्यांनी वाढला आहे. जळगाव झोनमध्ये ११.४२ टक्क्यांनी विजेचा वापर वाढला आहे. तर लातुर ८ टक्के, नांदेड १२.१७ टक्के नाशिक १०.८४ टक्के अशी कृषीपंप वीज ग्राहकांच्या वीज वापरात वाढ झालेली आहे. संपुर्ण राज्यात २०१७-१८ सालात २९ हजार ८०५ दशलक्ष युनिट इतका विजेचा वापर कृषी ग्राहकांमार्फत झाला होता. तर २०१८-१९ सालात हा विजेचा वापर ३३ हजार २६ दशलक्ष युनिट इतका पोहचला. मीटर आणि विना मीटर अशा दोन्ही प्रकारच्या कृषीपंप वीज ग्राहकांचा विजेचा वापर वाढला आहे. मीटर असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांचा विजेचा वापर हा १०.८९ टक्क्यांनी वाढला. तर विना मीटर कृषीपंप ग्राहकांचा वापरही जवळपास तितकाच म्हणजे १०.७९ टक्के इतका वाढला आहे.

- Advertisement -

थकबाकीचा डोंगर
महावितरणच्या कृषीपंप वीज ग्राहकांकडून थकबाकीचा डोंगर आता २९ हजार कोटी रूपयांवर पोहचला आहे. सातत्याने या थकबाकीमध्ये वाढ होत आहे. कृषीपंप वीज ग्राहकांकडून सक्तीने वसुली करण्याची मोहीम महावितरणकडून मागे पडल्यानेच राज्यात हा थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस आणखी वाढत चालला आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -