घरमुंबईलॉकडाऊनमध्ये गावी पोहचविण्यासाठी व्हॅक्सीन व्हॅनचा वापर; पालिकेने बजावली नोटीस!

लॉकडाऊनमध्ये गावी पोहचविण्यासाठी व्हॅक्सीन व्हॅनचा वापर; पालिकेने बजावली नोटीस!

Subscribe

केडीएमसीच्या ड्रायव्हरचा प्रताप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत औषध पुरवण्यासाठी सेवेत असलेल्या (व्हॅक्सीन व्हॅन) विनापरवाना लोणावळा येथे नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्हॅनमधून काही महिलांना गावी सोडण्यात येणार होतं. याप्रकरणाची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन वाहन चालकाला कारणे दाखवा नेाटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनीही याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली हेाती.

केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात बाबासाहेब भंडारे हा वाहन चालक कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चालक भंडारे हा व्हॅक्सीन व्हॅनमधून (एमएच ०५ आर- ०९२७) चार महिलांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी निघाला होता. याबाबत चालक भंडारे त्याने केडीएमसीची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. अत्यावश्यक सेवेतील औषध आणण्याकरता वापरण्यात येणारी व्हॅन लोणावळा चेक पोस्टवर स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून अडविण्यात आली. यावेळी वाहन चालकाला विचारणा केली असता त्याच्याकडून समाधान कारक उत्तर मिळाली नाहीत तसेच पालिकेकडून परवानगीचे पत्राची मागणी करण्यात आली.

- Advertisement -

अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांना दूरध्वनी वरून हा प्रकार सांगितला. मात्र सदर व्हॅन महापालिकेमार्फत लोणावळा येथे कोणत्याही शासकीय कामाकरता पाठवले नसताना, परस्पर लोणावळा येथे वाहन नेल्याने पालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ राजू लवंगारे यांनी वाहनचालक भंडारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ४८ तासाच्या आत लेखी खुलासा मागविला असून अन्यथा कारवाई करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे. त्यामुळे वाहन चालक काय खुलासा करतो याकडे लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -