घरमुंबईउड्डाणपुलाखालील जागांत ग्रीन स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करा; आदित्य ठाकरे यांचे आदेश 

उड्डाणपुलाखालील जागांत ग्रीन स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करा; आदित्य ठाकरे यांचे आदेश 

Subscribe

आदित्य यांनी बुधवारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकुल येथील कार्यालयाला भेट दिली.

मुंबईत उड्डाणपुलाखालील जागांमध्ये ग्रीन स्पेस निर्माण करणे आणि ही जागा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी तयार करण्याचे आदेश पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री, तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. आदित्य यांनी बुधवारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकुल येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान आदित्य यांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे सहाय्यक महानगर आयुक्त बी. जी. पवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत प्रस्तावित वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रोडचे सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबतच्या सूचना आदित्य यांनी दिल्या. मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बांधत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांच्या प्रगतीची आदित्य यांनी यावेळी माहिती घेतली.

नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता या व्यवसायिक आणि निवासी क्षेत्रातील वाहतूक सुलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल, अशी माहिती यावेळी आदित्य यांना देण्यात आली. तसेच त्यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाच्या भेटीनंतर वांद्रे कुर्ला संकुल ते नंदादीप गार्डन, पश्चिम द्रुतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाची स्थळपाहणी केली. आदित्य यांनी कलानगर उड्डाणपुलाच्या कामाचीही पाहणी केली. या कामांचा आढावा घेत असताना उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभिकरण, ग्रीन स्पेसमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट योजनांवरही त्यांनी चर्चा केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -