घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद

लॉकडाऊनमध्ये मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात केवळ मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या चौकडीला मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या चौकडीकडून १२ दुचाकी आणि ३ रिक्षा हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

अरशद अब्दुल रजाक शेख (१९), सुरज सरोज (१९), अमान रजा अब्दुल अजीज शेख (२०)आणि सुफीयान अन्सारी (१९) असे अटक करण्यात आलेल्या चौकडीचे नाव आहे. तिघे जण मुंब्रा येथे राहणारे असून सुरज सरोज हा दिवा येथे राहणारा आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंब्रा, दिवा, शीळडायघर परिसरातून वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे डझनभर गुन्हे दाखल झाल्यामुळे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे आणि पथकाने तपास सुरू केला.

- Advertisement -

दरम्यान मुंब्रा आणि दिवा परिसरात वाहन चोरी करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गळवे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गळवे यांनी पोलीस हवालदार रमेश माळी, अमोल यादव, तुषार पाटील, कमलाकर भोये, अब्दुल तडवी, गावित आणि खैरनार यापथकाने या टोळीवर पाळत ठेवून अरशद अब्दुल रजाक शेख, सुरज सरोज , अमान रजा अब्दुल अजीज शेख आणि सुफीयान अन्सारी याचौघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या टोळीने चोरलेल्या १२ दुचाकी, आणि ३ रिक्षा पोलिसांनी मुंब्र्यातील विविध परिसरातून हस्तगत केल्या आहेत. अटक करण्यात आलेली टोळी ही केवळ मौजमजेसाठी दुचाकी तसेच रिक्षा चोरी करीत होते. या वाहनातील इंधन संपताच ही वाहने सोडून दुसरे वाहन चोरी करीत होते अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -