घरमुंबईVideo: इडलीवाल्याकडे चटणी घेण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा

Video: इडलीवाल्याकडे चटणी घेण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा

Subscribe

तुम्ही रस्त्यावर खाद्य पदार्थ खरेदी करत असाल तर जरा सावधान... पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका अस्वच्छ इडलीवाल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.

तुम्ही रस्त्यावर खाद्य पदार्थ खरेदी करत असाल तर जरा सावधान… पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका अस्वच्छ इडलीवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही इडली चटणी खाणं सोडून द्याल. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इडली वडा विकणाऱ्या फेरीवाल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत हा इडलीवाला इडली वड्याच्या चटणीत टाकण्यासाठी आणि ग्राहकांना पिण्यासाठी, हात धुण्यासाठी लागणारं पाणी चक्क शेजारील रेल्वेस्थानाकाच्या अखत्यारीतील शौचालयातील वापरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलं आहे.

Video: इडलीवाल्याचे हे प्रताप पाहून तुम्ही व्हाल अवाक

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮೇ 31, 2019

- Advertisement -

हा इडलीवाला गेल्या कित्येक दिवसांपासून रेल्वे स्थानकाबाहेर अवैद्यरित्या इडली विक्री करायचा आणि दैनंदिन तो वापरासाठी शौचालयातील पाणी वापरायचा. एका ग्राहकाच्या ही बाब निदर्शनास आली असता त्याने या इडलीवाल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. सतीश सानप असं या व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

अशा प्रकारचा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे. त्या व्यक्तीवर लवकरच कारवाई केली जाईल. तो परिसर रेल्वेच्या अखत्यारीत येतो की पालिकेच्या याविषयी आमचे अधिकारी शोध घेत आहेत.

- Advertisement -

-शैलेश आढाव, सह-आयुक्त, एफडीए

या व्हिडिओने सध्या सोशल मीडियामध्ये खळबळ माजवली आहे. सामान्य नागरिकांमध्ये संताप असलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान, हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या इडलीवाल्याला ताब्यात घेऊन कारवाई करून सोडून दिलं. पण, अशा प्रकारच्या घटनांमुळे रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा –

स्वच्छतेची ऐशीतैशी! रेल्वे स्टॉलवर विकलं जातंय हात धुतलेलं लिंबूपाणी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -