घरमुंबईडॉ. विजय सूर्यवंशी केडीएमसीचे नवे आयुक्त

डॉ. विजय सूर्यवंशी केडीएमसीचे नवे आयुक्त

Subscribe

विजय सूर्यवंशी यांची कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

कल्याण डेांबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतानाच डॉ. सूर्यवंशी यांनी अलिबाग येथील सीआरझेड परिसरात असलेल्या सेलिब्रिटींच्या आणि बडया उद्योजकांच्या अनधिकृत बंगल्यांवर धडक कारवाई केली होती. सूर्यवंशी हे सहकार विभागातील अधिकारी आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पालघरचे सीईओ, नाशिक जिल्हा उपनिबंधक अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. डॉ. सूर्यवंशी हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याचे रहिवासी आहेत. उत्तम प्रशासक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच डॉ. सूर्यवंशी यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली हेाती. मात्र, ती बदली रद्द करण्यात आली असून कल्याण-डेांबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून आता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -