घरमुंबईभिवंडीत पैशावरून हाणामारी

भिवंडीत पैशावरून हाणामारी

Subscribe

उसनवारीच्या पैशावरुन भिवंडीत दोन व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पैशावरुन हाणामारी झाल्याच्या घटना भिवंडीत घडल्याचे समोर आले आहे. ही हाणामारी उसनवारीने घेतलेले पैसे परत मागायला गेल्याने झाल्याचे समोर आले आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात मारहाण झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना भिवंडी शहरात मंगळवारी घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शहर आणि नारपोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमके काय घडले?

पहिल्या घटनेत बागे फिरदोस कंपाऊंड येथे कारखान्यात काम करणारा कामगार अनुज सिंग (३५) याने त्याचा साथीदार चिंटू सिंग या साथीदाराकडून १०० रुपये उसने घेतले होते. उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी चिंटूने अनुजचे घर गाठले आणि त्यांनी उसने घेतलेल्या शंभर रुपयांची मागणी केली. मात्र, ‘संध्याकाळच्या वेळेस उसने पैसे देत नाही’,असे अनुजने चिंटूला सांगितले. दरम्यान, चिंटू आणि अनुज या दोघांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. त्यात चिंटू याने अनुजच्या डोक्यावर लाकडी लाटणे आणि दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहे. तर दुसऱ्या घटनेत नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलासनगर पहाडी हनुमान मंदिर येथे राहणाऱ्या जस्सीम नसीम शेख (२१) याने राहुल मदनप्रसाद गुप्ता (१८) यांच्याकडून पैसे उसने घेतले होते. हे उसने घेतलेले पैसे देण्यास जस्सीम नकार देत असल्याचा राग आल्याने राहुल आणि त्याच्या साथीदाराने जस्सीम याच्या डोक्यात लाकडी बांबूने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता नारपोली पोलिसांनी राहुल यास अटक केली आहे तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.एस.शेख हे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धोनीलाच खेळायचं नाही? रवी शास्त्री म्हणतात, ‘वर्ल्डकपपासून धोनी भेटलाच नाही’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -