घरमुंबईलोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र - उद्धव ठाकरे

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र – उद्धव ठाकरे

Subscribe

मुंबई : राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) ‘मातोश्री’वर  (Matoshree) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटीला आले आहेत. या दोघांमध्ये बैठक पार पडल्यानंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशासमोर सध्या जो प्रश्न आहे तो फार मोठा आहे. त्यामुळे नुसते विरोधी पक्षाचे समीकरण असावे हा मुद्दा नाही आहे, तर देशामध्ये मी करण जे चालू आहे त्याच्याविरुद्ध समीकरण होत आहे. सर्व पक्षांचे प्रत्येकाचे काही विचार आहेत, त्यालाच लोकशाही म्हणतात आणि तीच जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, दिवसांमागून दिवस चालले आहेत आणि निवडणूका समोर येण्यासाठी एक वर्ष शिलल्क राहिलेले  आहे. मधल्या काळामध्ये भारतील जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई जे बोलून गेले ते अनावदनाने बोलून गेले असतील की, सर्व पक्ष संपतील आणि एकच पक्ष राहील. हाच एक मोठा धोका सर्व पक्षांसाठी निर्माण झालेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपाने ज्या पद्धतीने शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेमध्ये गद्दारी घडवून आणली तसाच प्रकार काही पक्षांमध्ये करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले की, सत्तेचा हव्यास किती आहे हे मी काल नागपुरच्या सभेमध्ये बोललो आहे. नरभक्षक हा एक नवीन शब्द या लोकांसाठी वापरला तर काही वावग ठरणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सत्ता भक्षक बाकी कोणी असता कामा नये. देशामध्ये फक्त मी, मी आणि मीच असे पाहिजे. त्या मी करणाविरुद्ध विरोधीपक्षाचे समीकरण जुळत आहे. शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा फक्त मैत्री नाही तर एक नाते निर्माण होते. आम्ही भाजपासोबत 25 वर्षे नाते जपले, पण दुर्भाग्याची गोष्टी अशी की, त्यांना हे समजले नाही की, मित्र कोण आणि विरोधी कोण, ते त्याचे नशीब. पण आम्ही पुढे जाऊन देशात जे प्रजातंत्र सुरू आहे त्याची लढाई करण्यासाठी एकत्र राहणार आहोत. सध्या देशातील नागरिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे ते सर्व लोक आम्हाला साथ देतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -