घरताज्या घडामोडीदेशातील अराजकता, हुकूमशाही संपवण्यासाठी आम्ही एकत्र - के.सी. वेणुगोपाल

देशातील अराजकता, हुकूमशाही संपवण्यासाठी आम्ही एकत्र – के.सी. वेणुगोपाल

Subscribe

'देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत', असे के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले. के.सी. वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. के.सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

‘देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत’, असे के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले. के.सी. वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. के.सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, भाई जगताप, आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. (We are together to end anarchy, dictatorship in the country says K C Venugopal vvp96)

“उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज मी मातोश्री येथे आलो आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा निरोप घेऊन आलो आहे. काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या लढ्यात खंभीरपणे पाठीशी आहे. मोदींच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. दिवसेंदिवस ईडी व सीबीआयकडून शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. तसेच, इतर विरोधी पक्षांनाही टार्गेट केले जात आहे”, असे के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

- Advertisement -

“देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. उद्धव ठाकरे यांचा एक लढा सुरु आहे काँग्रेस त्यांच्यासोबत ठामपणे उभी आहे”, असेही वेणुगोपाल यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – आदित्यजी.. श्रद्धा जाधव, सूरज चव्हाणमुळे मी पक्ष सोडला – अमेय घोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -