घरमुंबईथेट रुग्णालयातून राऊत यांचे ट्विट; 'हम होंगे कामयाब'

थेट रुग्णालयातून राऊत यांचे ट्विट; ‘हम होंगे कामयाब’

Subscribe

संजय राऊत गेल्या १५ दिवसांपासून प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडत होते. रोज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेत असत. त्याअगोदर ट्विट देखील करत असे. आज ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत उपचारासाठी काल दुपारपासून म्हणजेच सोमवारपासून लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. संजय राऊत गेल्या १५ दिवसांपासून प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडत होते. रोज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते पत्रकार परिषद घेत असत. त्याअगोदर ट्विट देखील करत असे. आज ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, तरीदेखील रूग्णालयातून त्यांनी ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी ‘कोशीश करने वालों की कभी हार नही होती’, असे ट्विट केले आहे. यासोबतच ‘हम होंगे कामयाब’ असेही राऊत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

- Advertisement -

राऊत यांच्या ह्रदयात २ ब्लॉक

संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे काल दुपारी ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. काल त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या ह्रदयात २ ब्लॉक असल्याचं निष्पन्न झाले. त्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती’ अशा कवितेच्या ओव्या शेअर केल्या.

‘हम होंगे कामयाब…जरुर होंगे’

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत मदभेद झाले. मुख्यमंत्री पदावरुन युती तुटल्याचे चित्र निर्माण झाले. भाजपने माघार घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. मात्र, त्यासाठी फक्त २४ तासांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत शिवसेना १४५ जागांचा पाठिंबाचा दावा करु शकली नाही. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेची कोंडी केली असे बोलले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी ‘हम होंगे कामयाब…जरुर होंगे’ असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -