घरमुंबईWestern Railway : ओव्हरहेड वायर तुटली, लोकल उशिराने; संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

Western Railway : ओव्हरहेड वायर तुटली, लोकल उशिराने; संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

Subscribe

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) दहिसर-बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलसह तीन लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी लोकलमधून खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरून प्रवास सुरू केला आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून बोरीवलीवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.

- Advertisement -

सकाळी दहा वाजताच्या सुमारास बोरीवली-चर्चगेट अप फास्ट मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना ऑफिसला पोहोचण्यास उशीर झाला असून सध्या तापमान वाढीमुळे उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे एका एसी लोकलसह दोन लोकल गाड्या दहिसर-बोरीवली दरम्यान अडकल्या आहेत. त्यामुळे इतर लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात आल्यामुळे धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील सर्वच लोकल उशिराने धावत आहेत. यामुळे एक्स्प्रेस वाहतूकीलाही फटका बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -