Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पंजाबमध्ये लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू; संरक्षण मंत्र्यांनी मागवला अहवाल

पंजाबमध्ये लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू; संरक्षण मंत्र्यांनी मागवला अहवाल

Subscribe

पंजाब : पंजाबच्या भटिंडा येथील जुन्या लष्करी तळावर गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे (Firing at an old army base in Bathinda). पहाटे 4.35 च्या सुमारास गोळीबार झाला असून यात 4 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ऑफिसर्स मेसमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेत मारले गेलेले सैनिक होते की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

हा दहशतवादी हल्ला नव्हता
भंटिडाचे एसएसपी यांनी स्पष्ट केले आहे की, लष्करी तळावर झालेला गोळीवार हा दहशतवादी हल्ला नव्हता. दरम्यान तळावर लष्कराचे अधिकारी पोहचले आहेत आणि त्यांनी चौकशी सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी भंटिडा लष्करी तळावरुन एक रायफल आणि काही काडतूसे गायब झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

संरक्षण मंत्र्यांनी मागवला अहवाल
लष्करी तळावरील घटनेचा अहवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कराकडून मागवला आहे. तसेच पंजाब सरकारने भटिंडा पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे. लष्करी तळावर सैनिकांची कुटुंबे राहतात. या सर्वांना लष्कराने आपापल्या घरात राहण्यास सांगितले आहे आणि लष्कारी तळावर असलेल्या शाळेला आज सुटी देण्यात आली आहे.

- Advertisement -

आशियातील सर्वात मोठा तळ
भटिंडा लष्करी तळ आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना लष्करी तळ आहे. या तळ सुमारे 45 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. याठिकाणी असलेला दारूगोळा डेपो हा देशातील सर्वात मोठ्या डेपोपैकी एक आहे. हा लष्करी तळ आधी शहरापासून लांब होता. पण नंतर शहराचा विस्तार होत गेला आणि लष्करी तळ शहरात आला. या लष्करी तळापर्यंत कोणीही सहज पोहचू शकतो. त्यामुळे या तळाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था असून २४ तास लष्करी जवान पहारा देत असतात. गोळीबारीच्या घटनेनंतर लष्करी तळाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

- Advertisment -