घरट्रेंडिंग21 व्या वर्षी प्रभू श्रीराम असे दिसायचे; फोटो व्हायरल

21 व्या वर्षी प्रभू श्रीराम असे दिसायचे; फोटो व्हायरल

Subscribe

सोशल मीडियावर सध्या भगवान श्री रामांचा एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) ने बनवलेले एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. असं म्हटलं जातय की, श्रीराम जेव्हा 21 वर्षांचे होते त्यावेळी ते असे दिसायचे. या फोटो व्यतीरिक्त आणखी श्रीरामांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात ते हसताना दिसत आहेत. हे दोन्हींना सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

हा फोटो शेअर करत असणाऱ्या अनेकांनी खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “वाल्मिकी रामायण, रामचरितमानस यांसारख्या ग्रंथांमध्ये दिलेल्या तपशीलानुसार, श्रीरामांचा हा एआय जनरेट केलेला फोटो आहे. ते वयाच्या 21 व्या वर्षी असे दिसायचे.”

- Advertisement -

एका नेटकऱ्याने म्हटलंय की, ‘प्रभू रामाचे मनमोहक चित्र पाहून आजपर्यंत पृथ्वीवर इतका देखणा कोणीही जन्माला आलेला नाही.’ तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘डिजिटल युगातील सर्वोत्कृष्ट चमत्कार, AI ने वाल्मिकी रामायण, रामचरितमानससह सर्व ग्रंथांमध्ये दिलेल्या तपशीलानुसार, भगवान श्री रामचंद्रांचा सुंदर फोटो तयार केला आहे.’ दरम्यान, एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) ने काही ठिकाणांचे जनरेट केलेले फोटो देखील समोर आले आहेत. त्यातील एका फोटोत ताजमहालच्या बांधकामाशी संबंधिक फोटो व्हायरल होत आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

100 वर्षांनंतर घडणार अद्भूत योगायोग; 3 वेगवेगळ्या रुपात दिसणार सूर्यग्रहण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -